InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘ही’ नवी पिढी दोन कुटुंबातील राजकीय वैर संपवणार?

विखे पाटील आणि पवार कुटुंबाचं राजकीय वैर जगजाहीर असताना त्यांच्या तिसऱ्या पिढीकडून मात्र मैत्रीचा हात मिळवला जातोय. एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दिली जाणार का, याविषयी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन युवा चेहरे एकत्र पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रवरामधील विखे पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली. यावेळी सुजय आणि रोहित एकत्र दिसले.

राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध अजित पवार हे चित्र महाराष्ट्राने बघितलं आहे. विरोधी पक्षात आल्यावर मात्र विखे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये संवाद सुरु झाला. आता तिसऱ्या पिढीतील सुजय विखे पाटील आणि रोहित पवार एकत्र हे तरुण नेते दोन कुटुंबांतील राजकीय वैर संपवून नवी मैत्री सुरु करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.