उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू सावरत असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींनी मात्र वेग पकडला आहे. आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उडालेल्या चर्चांचा धुराळा खाली बसत नाही तोच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली.

याबाबत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असे वक्तव्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मात्र, पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहतील का राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की, राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयावर पवार साहेब एकदा बोलले की, त्या विषयावर आम्ही कोणी बोलत नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा