उत्पल पर्रीकर ‘आप’कडून लढणार? पणजीतून तिकिटाची खुली ऑफर

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही. याबद्दल आता यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट उत्पल पर्रीकर यांना निवडुण आणण्याची जबाबदारी घेतली आहे. यापुर्वीही राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेतुन निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती.

यानंतर आदमी पक्षाने देखील उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. अन्यथा ते अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गोव्यात ४० विधानसभा जागा आहेत. ज्यामध्ये भाजपने आपले आज ३४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सध्या सर्वांचे लक्ष गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना कोणत्या जागेचे तिकिट मिळणार याकडे आहे. आता जाहीर केलेल्या भाजपच्या यादीत उत्पल पर्रिकरांचे नाव नाही. भाजपने अद्याप तिकिट दिले नसल्याने आता आम आदमी पक्षाने त्यांच्यासाठी खुली ऑफर दिली आहे. आपने गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते व वकील अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे.

पालेकर यांनी उत्पल पर्रीकर यांना ही ऑफर दिली आहे. त्यांच्या ऑफरमुळे खळबळ उडाली आहे. पालेकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर हे गोव्यातील अतिशय मोठे नेते होते. त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकिट मिळत नाही. त्यांना आम्ही तिकिट देऊ शकतो. ते आमच्याकडून लढू शकतात. यानंतर आता ते हि ऑफर स्वीकारणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा