InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानात आयएसआयने केला होता 40 तास छळ

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांनी आयएसआय या कुख्यात गुप्तहेर संघटनेकडे सोपवण्यात आले होते.

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेऊन सुमारे चार तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्यात आले. आयएसआयचे अधिकारी त्यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे घेऊन गेले. तिथे अभिनंदन यांना सुमारे 40 तास स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अनन्वित छळ करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.