InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विजयाची धुंद; दुष्काळाकडे दुर्लक्ष

- Advertisement -

राज्यात भीषण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना मंत्री दुष्काळी पर्यटनात मग्न असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

- Advertisement -

दुष्काळाच्या पाहणीसाठी विदर्भात आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे चारा छावणींना अनुदान नाही तर कुठे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध नाही.

लोकसभा विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. दुष्काळी मदतीसाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दबावाला शेतकरी संघटना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सध्या मान्सूनपूर्व पाऊस ३० टक्केच पडला असून मान्सून अंदाजाबाबत हवामान खातेही अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी न मिळण्यास कारखान्यासह राज्य व केंद्र सरकारही जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.