Winter Care Tips | हिवाळ्यात वाढत्या सुस्तीवर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ खाद्यपदार्थांचा समावेश

Winter Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter)आपल्याला आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ रजाईमध्ये घालायला आवडतो. थंडीमध्ये आळस आणि ऊर्जेची कमतरता निर्माण झाल्याने जास्त झोप येते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर ताजेतवाने राहायचे असेल आणि अंथरुणापासून दूर राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात. हिवाळ्यामध्ये वाढत्या सुस्तीवर मात करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

हिवाळ्यात (Winter) सुस्तीवर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ खाद्यपदार्थांचा समावेश

सफरचंद

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो, असे म्हटले जाते. कारण सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, एंटीऑक्सीडेंट, फायबर इत्यादी पोषक घटक आढळतात. हे घटक शरीरातील मेटाबोलिझम सुधारतात. परिणामी आळस कमी होतो. या हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर ताजेतवाने राहायचे असेल, तर तुम्ही दररोज सकाळी एका सफरचंदाचे सेवन केले पाहिजे.

सोयाबीन

हिवाळ्यामध्ये सोयाबीन ऊर्जेचा चांगला स्त्रोत मानला जातो. तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये जास्त सुस्ती जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करू शकतात. कारण यामध्ये पोषक प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कॉपर उपलब्ध असते. हे गुणधर्म शरीराला ऊर्जा प्रदान करते.

केळी

हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर तुमची ऊर्जा दिवसभर टिकून ठेवायची असेल, तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करू शकतात. कारण केळीमध्ये अनेक पोषक घटके आढळतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केळीचे मिल्कशेक बनवून त्याचे सेवन करू शकतात.

अंडी

हिवाळ्यामध्ये अंड्याचे सेवन कारणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण हिवाळ्यामध्ये अंडी एक सुपर फूड मानले जाते. त्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला, तर तुम्ही सुस्तीपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.