Winter Health Care | हिवाळ्यामध्ये एक चमचा तूप खाऊन ‘या’ आजारांपासून रहा दुर

टीम महाराष्ट्र देशा: ‘तूप खाऊ नकोस जाड होशील’ असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर तूप खाल्ल्याने आपले वजन वाढेल म्हणून आपण तुपाचे सेवन करणे टाळतो. पण असे नसून सकाळ संध्याकाळ दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित कोणत्या आजाराने ग्रस्त असेल तर तूप निश्चितच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र निरोगी व्यक्तीसाठी तूप खूप फायदेशीर आहे. थंड (Winter) हवामानामध्ये तू शरीराला निरोगी ठेवते.

थंडी (Winter) मध्ये तुपाचे सेवन केल्याने मिळणारे फायदे

हिवाळ्यामध्ये तुपाचे सेवन ठरेल त्वचेसाठी फायदेशीर

तुपामध्ये मुबलक प्रमाणात फॅटी ॲसिड आढळून येते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुपाचे सेवन केल्याने त्वचेला खूप फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर तुपाच्या नियमित सेवनाने त्वचेवरील कोरडेपणा देखील निघून जाण्यास मदत होते. थंडीमध्ये नियमित तूप खाल्ल्याने त्वचा मॉइश्चरायझर आणि मऊ राहते.

थंडीत तुपाच्या सेवनाने अपचनाची समस्या दूर होते

तुपामध्ये फॅट व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे तुपाच्या सेवनाने हिवाळ्यात अपचनाची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळून येते. जे आपला मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

सर्दी खोकल्यावर रामबाण इलाज आहे तूप

थंडीचा मोसम सुरू होताच अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास व्हायला लागतो. सर्दी आणि खोकल्याच्या समस्येवर तूप एक गुणकारी उपाय आहे. तुपामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टरियल गुणधर्म आढळतात. जे सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या थंडीमध्ये सर्दी खोकला दूर करण्यासाठी तुम्ही थेट एक चमचा तूप गरम करून त्याचे सेवन करू शकतात.

हिवाळ्यामध्ये डोळ्यांसाठी फायदेशीर आहे तू

नियमितपणे तुपाचे एक चमचा सेवन केल्याने आपली दृष्टी तीक्ष्ण शकते. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितले आहे की, नियमित तुपाचे सेवन केल्याने आपले डोळे निरोगी राहतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.