Winter session | नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
Winter session | नागपूर : उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. आज विरोधकांची बैठक देखील पार पडली. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आणि कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून सोमवारी हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच फॉक्सकॉनसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत ‘हल्ला बोल’ निषेध मोर्चा काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह नामवंत व्यक्तींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपाल यांच्या विरोधात शक्तीप्रदर्शन केले. महाविकास आघआडीने भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली होती.
या अधिवेशनात राज्य सरकार ११ विधेयके मांडण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राज्य सरकारने या विधेयकांवर चर्चेसाठी पुरेसा वेळ द्यावा, घाईगडबडीत मंजूर करू नये, असे अजित पवार म्हणाले. तसेच तीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Gaikwad | कालचा मोर्चा अभद्र युतीचा; संजय गायकवाड यांची टीका, संजय राऊतांवर पलटवार
- Bacchu Kadu | सत्ता गेल्यानंतर मोर्चा काढावे लागतात ; बच्चू कडू यांचा घणाघात
- Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी प्रगल्भ पण…” ; संजय राऊतांचा पलटवार
- Sanjay Raut | सीमावादावर ‘जैसे थे’ परिस्थिती म्हणजे नॅनो बुध्दीचं लक्षण ; संजय राऊतांची टीका
- Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे त्यांचा मोर्चाही..”; देवेंद्र फडणवीस यांचा मिश्किल टोला
Comments are closed.