Winter Session | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवार यांची माहिती

Winter Session | नागपूर : उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. आज विरोधकांची बैठक देखील पार पडली. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आणि कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून सोमवारी हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच फॉक्सकॉनसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीने  शनिवारी मुंबईत ‘हल्ला बोल’ निषेध मोर्चा काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह नामवंत व्यक्तींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपाल यांच्या विरोधात शक्तीप्रदर्शन केले. महाविकास आघआडीने भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली होती.

या अधिवेशनात राज्य सरकार ११ विधेयके मांडण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राज्य सरकारने या विधेयकांवर चर्चेसाठी पुरेसा वेळ द्यावा, घाईगडबडीत मंजूर करू नये, असे अजित पवार म्हणाले. तसेच तीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.