Winter Session 2022 | अमित शहांसोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंचे अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर

Winter Session 2022 | नागपूर : काही दिवसांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना अडवण्यात येणार नाही, असं सांगण्यात आले. पण आता राज्यातील नेत्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे या बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी”, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात केली आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  “विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली आणि बैठक बोलावली. गेल्या अनेक वर्षात हे पहिल्यांदा घडलं आहे. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. या बैठकीत आम्ही सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली. मराठी लोक कर्नाटकमध्ये जातात, त्यांच्या गाड्या फोडल्या जातात, त्यांना अडवलं जातं. हे प्रकार लोकशाहीला धरुन नाहीत. त्यामुळे हल्ल्यावर प्रतिहल्ला होऊ शकतो, असा इशारा आम्ही दिला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिली, अशा प्रकारचे कृत्य होऊ नये.”

शिंदे म्हणाले, “या प्रकरणात राजकारण करु नये. सीमावासियांच्या मागे उभे राहीले पाहीजे. राजकारण करायला खूप विषय आहेत. यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. योजना बंद केल्या. आम्ही सरकार आल्यानंतर पहिले त्या योजना सुरु केल्या. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. सीमावासीय ठराव करतात. मात्र यामागे कुठले पक्ष आहेत. याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्या ४८ गावांना आम्ही २ हजार कोटींची योजना मंजूर केली.”

“आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर सांगितले. तुम्ही ट्वीट करत आहात. ते ट्वीट चुकीचे आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला हे ट्वीट आमचे नाही. ट्वीट ज्यांनी केलं. त्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्या ट्वीट मागे कोण आहे. कुठला पक्ष आहे. याची माहिती लवकर मिळेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.