Winter Session 2022 | उद्योगाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज, माझ्यासोबत येऊन चर्चा करा – आदित्य ठाकरे
Winter Session 2022 | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विधान भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थाने असलेल्या ‘रामगिरी’ आणि ‘देवगिरी’ येथेही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. कर्नाटक सीमा वाद सुरू आहे पण घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. उद्योग महाराष्ट्र बाहेर गेलेत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं माझ्यासोबत माध्यमांसमोर येऊन चर्चा करावी पण त्यावर ते बोलत नाहीत. मागील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण त्यावर बोलत नाही, ओला दुष्काळ झाला, असे मुद्दे आहे सभागृहात उचलू.”
दरम्यान अधिवेशन सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक होण्याची चित्र दिसत आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य आणि कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉनसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा आणणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यासंदर्भात विधेयक मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी नवीन (सुधारित) कायदा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | 50 खोके एकदम ओके, विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर
- Devendra Fadnavis | वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – देवेंद्र फडणवीस
- Winter Session | अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे ; अजित पवार यांची मागणी
- Winter Session | सीमाप्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारला पूर्णपणे अपयश – अजित पवार
- Nitin Satpute | चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढणार? ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका
Comments are closed.