Winter Session 2022 | ‘घेतले खोके, भूखंड ओके’ ; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. त्याचवेळी पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. आज विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केला. विरोधकांनी हातात श्रीखंडाचे डबे घेत जोरदार घोषणाबाजी केली.

‘घेतले खोके, भूखंड ओके’, ‘दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे’, ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’, ‘धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो’, ‘बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात आंदोलन केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.