Winter Session 2022 | “निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणा…” ; विरोधकांची घोषणाबाजी, कामकाजावर बहिष्कार

Winter Session 2022 | नागपूर : नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून विधानसभेत गोंधळ सुरु आहे. पहिल्या दिवशी कर्नाटक सीमावाद, तर काल दिशा सालियान प्रकरण पुन्हा बाहेर आले. महत्वाच्या, समाजहिताच्या चर्चा बाजूला सारत हा जूना मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला. या मुद्यावर १० पेक्षा जास्त सत्ताधारी सदस्यांनी भूमिका मांडली. मात्र विरोधकांना बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे जंयत पाटील थेट अध्यक्षांवर संतापले. यावेळी त्यांनी अपशब्दाचा वापर केला. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. याला विरोध म्हणून आज देखील विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

आज काँग्रेस विधिमंडळच्या कार्यालयात विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अजित पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. काल आम्ही सभागृहाचा त्याग केला. आज देखील आमची तीच भूमिका आहे. जयंत पाटील यांना सभागृहात बसू दिले, त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, ही आमची मागणी आहे. मात्र सरकार ही मागणी मान्य करत नाही. त्यामुळे आम्ही आज दिवसभर कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

कर्नाटक मुद्यांवर अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे वेगवेगळे ठराव करत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक आणि बेळगावमधील मराठी लोक नाराज झाले आहे. ही बाब आम्ही अध्यक्षांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. अशा प्रकारचा ठराव महाराष्ट्रात कठोरपणे मांडला गेला पाहीजे. याबाबत महाविकास आघाडीचे एकमत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.