Winter Session 2022 | बाप्पू आणि पप्पू यांनी अधिवेशनामध्ये गोंधळ घालू नये ; रवी राणा यांची ठाकरे पिता-पुत्रावर टीका
Winter Session 2022 | अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी विदर्भाच्या लोकांना न्याय देण्यासाठी परंपरेला कायम ठेवत नागपुरात अधिवेशन ठेवले. उद्धव ठाकरे म्हणजे बाप्पू आणि त्यांचा मुलगा पप्पू आदित्य ठाकरे हे दोघेही विदर्भाच्या धरतीवर अधिवेशनासाठी आले आहेत. त्यांना विनंती आहे की अधिवेशन पूर्णपणे चालू द्या. कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि राजकारण करु नका. तुमच्या हातात सत्ता दिल्यानंतर तुम्ही ते करु शकले नाही,” असे रवी राणा म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे शाब्दिक हल्लाबोल देखील होऊ शकतो.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांची मिटींग बोलावली आहे. या मिटींगमध्ये उद्धव ठाकरे आमदारांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न, भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, हे मुद्दे शिवसेना आमदार उपस्थित करु शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “ज्यांच्या डोक्यात शेण भरलं आहे, त्या व्यक्तीला…”; पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरींचा पलटवार
- Sachin Sawant | “भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत”; सचिन सावंत असं का म्हणाले?
- Winter Session 2022 | बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही ; एकनाथ शिंदेंची ग्वाही
- Winter Session 2022 | उद्योगाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज, माझ्यासोबत येऊन चर्चा करावी – आदित्य ठाकरे
- Amol Mitkari | “धैर्यशील माने यांना दुसऱ्या राज्यात जाण्यास मनाई असेल तर कसली ही आझादी?”; अमोल मिटकरींचा संतप्त सवाल
Comments are closed.