Winter Session 2022 | बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही ; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Winter Session 2022 | नागपूर : नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे बोलत होते.

“या नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढली आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन धर्मराव बाबा आत्राम यांना तत्काळ सुरक्षा द्यावी शिवाय प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी”, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.