Winter Session 2022 | भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा ; छगन भुजबळ यांची मागणी

Winter Session 2022 | नागपूर : महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2022 मध्ये राज्य सरकार आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमने-सामने आले आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांच्या घोषणाबाजीने झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्य सरकारने विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष सुरू झाला. यावेळी छगन भुजबळ यांनी महत्वाची मागणी केली आहे.

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहेत. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्या, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नियम 97 अन्वये सूचना मांडली.

यावेळी भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पत्रात महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाडा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यामुळेच आज महिला शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेल्या भिडेवाड्याची स्थिती चांगली नाही. बुधवार पेठेतील हा वाडा केव्हाही कोसळू शकतो आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला. विद्यार्थिंनी शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्या इमारतीची सद्यस्थिती दुर्दैवाने अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पुन्हा गरीब मुलींसाठी शाळा सुरू करण्याची जनतेची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.