Winter Session 2022 | ‘राष्ट्रवादीच्या आमदाराला नक्षलवाद्यांकडून धमकी’, अजित पवारांच्या मुद्द्यावर फडणवीस सतर्क
Winter Session 2022 | नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. यावर गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.
“नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढली आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन धर्मारावबाबा आत्राम यांना तत्काळ सुरक्षा द्यावी शिवाय प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी,” अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्या मुद्द्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार यांनी अतिशय गंभीर बाब समोर आणली आहे. आपल्या राज्याचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. सगळी आवश्यक सुरक्षा त्यांना पुरवण्यात येईल.
दरम्यान अधिवेशन सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक होण्याची चित्र दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “अमित शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाहीर करा”; अजित पवार यांची मागणी
- Winter Session 2022 | तुम्हाला सरकारमध्ये संधी हवी का? विधानसभेत फडणवीसांचा सुनील प्रभूंना सवाल
- Uddhav Thackeray | “मुंबईतील मोर्चा म्हणजे ईव्हीएमची कलाकारी नव्हती”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचा पलटवार
- Winter Session 2022 | उद्योगाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज, माझ्यासोबत येऊन चर्चा करा – आदित्य ठाकरे
- Winter Session 2022 | 50 खोके एकदम ओके, विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर
Comments are closed.