Winter Session 2022 | विधानसभेत सत्ताधारी मंत्रीच नाहीत, प्रश्न विचारणार कुणाला? अजित पवार संतापले

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी विधानसेभत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार आज चांगलेच संतापले, अजित सत्ताधारी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे त्यांनी थेट अध्यक्षांना सवाल केला.

अजित पवार म्हणाले, “रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन सभागृहात आहेत. महिला व बालकल्याणचे लोढाजी सभागृहात नाहीत. नगरविकास खात्याची जबाबदारी असलेले मंत्री नाहीत. हे काय सुरु आहे. सरकार किती गांभीर्याने घेत आहात. अध्यक्ष महोदय आम्ही देखील सरकारमध्ये काम केलय. उगीच काही चालणार नाही, रेटून कामकाज होणार?”

राज्यमंत्री नाहीत असुद्या पण किमान मंत्र्यांनी तरी सभागृहात हजर राहावे, हे योग्य नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला. यानंतर देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. त्यांनी अजित पवारांच्या तक्रारीवर उत्तर देत मंत्र्यांना निरोप पाठवल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.