Winter Session 2022 | सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर – मुख्यमंत्री
Winter Session 2022 | नागपूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल. तसेच या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहेत. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्या, अशी मागणी करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नियम 97 अन्वये सूचना मांडली होती.
आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पत्रात महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाडा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यामुळेच आज महिला शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेल्या भिडेवाड्याची स्थिती चांगली नाही. बुधवार पेठेतील हा वाडा केव्हाही कोसळू शकतो आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला. विद्यार्थिंनी शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्या इमारतीची सद्यस्थिती दुर्दैवाने अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पुन्हा गरीब मुलींसाठी शाळा सुरू करण्याची जनतेची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा ; छगन भुजबळ यांची मागणी
- Sanjay Raut | “भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांचा इतिहास पण पुसला जाईल”; संजय राऊतांचा घणाघात
- Eknath Shinde on Lionel Messi | मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात घडत नाहीत – एकनाथ शिंदे
- Sanjay Raut | स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचं योगदान हे खणखणीत सत्य – संजय राऊत
- Winter Session 2022 | “सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हे…” ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन
Comments are closed.