Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर
Winter Session 2022 | नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला. हा ठराव मांडल्यानंतर सीमाभागातील नागरीकांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली.
आवश्यक सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कर्नाटकातील बेळगावी, कारवार, निपाणी या शहरांसह महाराष्ट्रातील ८६५ गावांच्या प्रत्येक इंच जमिनीचा समावेश करण्यासाठी सरकार पावले उचलेल, असे ठरावात म्हटले आहे.
सीमा वादग्रस्त गावात राहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन पूर्ण ताकदीने उभे राहील, असे ठरावात म्हटले आहे. लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे सरकारने विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला विनंती करावी आणि सीमाभागातील मराठी लोकांच्या सुरक्षेची हमी सरकारला पटवून द्यावी.”
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या मुलीची TET प्रमाणपत्राविना कायम नेमणूक, धक्कादायक माहिती समोर
- Urfi Javed | उर्फी जावेदचा बेभान अंदाज, नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर
- Budget Car | 6 लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ जबरदस्त कार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.