Winter Session 2022 | सीमावादाचा ठराव सभागृहात का मांडला जात नाही?, अजित पवार संतापले

Winter Session 2022 | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा तसेच आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे, अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला. आज ठराव यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसे उत्तर दिलं पाहिजे असं सर्वांचं मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे.”

‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक’ ‘राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या’, ‘द्या खोके, भूखंड ओके’, ‘घेतले खोके माजलेत बोके’ ‘कर्नाटक सरकार हाय हाय’, अशा घोषणा देत आज अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.