Winter Session 2022 | “स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान” ; मुख्यमंत्र्यांनी केले सरोज अहिरेंचे कौतुक
Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे उपस्थित होत्या. आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी कार्यरत राहणे आणि विधिमंडळाच्या बाहेर आपल्या वैयक्तिक जीवनात एका बाळाची आई म्हणून मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळेस समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने आमदार सरोज अहिरे यांचे कौतुक केले.
मी आमदार आहे आणि आता आईही झाले. त्यामुळे दोन्ही कर्तव्य बजावणे माझं काम आहे, असं सरोज अहिरे म्हणाल्या. एक आई म्हणून बाळाची काळजी घेतेय. तर एक आमदार म्हणून मतदारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात सहभागी व्हायला आले, असे सरोज अहिरे म्हणाल्या.
त्याचबरोबर विधानभवन परिसरात फिडिंग रुम किंवा हिरकणी कक्ष व्हावा, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली. वातावरण कसंही असलं तरी शिंदे सरकार असो किंवा ठाकरे सरकार असो शेवटी मतदारसंघातील प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी वातावरण कसंही असलं तरी आपले प्रश्न मांडण्यासाठी यावं लागतं, असेही त्यांनी सांगितले.
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या, “देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रशंसक हा केवळ अडीच महिन्यांचा असून माझ्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून त्याला इथे घेऊन आलो आहोत, जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलेली आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | “रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत?”; गोपीचंद पाडळकरांचा सवाल
- Winter Session 2022 | अमित शहांसोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंचे अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर
- Eknath Shinde | सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं; म्हणाले, “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”
- Winter Session 2022 | बोम्मई यांच्या ट्विटमागे कोणता पक्ष? लवकरच कळेल ; एकनाथ शिंदेंचे विरोधकांना उत्तर
- Winter Session 2022 | अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन ‘या’ आमदार पोहोचल्या अधिवेशनात ; ‘हिरकणी’ कक्षाची केली मागणी
Comments are closed.