Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती मॉइश्चरायझर
Winter Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) वातावरणामुळे त्वचेला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणा टाळण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला जास्त काळ मऊ आणि हायड्रेट ठेवू शकत नाही. त्याचबरोबर या उत्पादनांमध्ये केमिकलचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता देखील अधिक असते. त्यामुळे या हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी तुम्ही घरी मॉइश्चरायझर (Moisturizer) बनवू शकतात.
या हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या त्वचेला रसायनांच्या प्रभावापासून वाचवायचे असेल आणि नैसर्गिकरीत्या तुमच्या त्वचेला मुलायम बनवायचे असेल, तर तुम्ही हे घरगुती पद्धतीने बनवलेले मॉश्चरायजर वापरू शकतात. घरी मॉइश्चरायझर बनवण्यासाठी तुम्हाला ग्लिसरीन, गुलाब जल आणि लिंबाचा रस हे साहित्य लागेल. या तिन्ही गोष्टींचा त्वचेवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. या तिन्ही गोष्टींपासून बनवलेले मॉइश्चरायझर त्वचेला पोषण देऊन हायड्रेट ठेवते.
घरी मॉइश्चरायझर बनवण्यासाठी तुम्हाला ग्लिसरीन आणि गुलाब जल समप्रमाणात घ्यावे लागेल. तुम्ही जर ग्लिसरीन आणि गुलाब जलचे अर्धा कप मिश्रण केले असेल, तर तुम्हाला त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. जर तुम्ही एक कप गुलाब जल आणि ग्लिसरीन घेतले असेल तर तुम्हाला त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळावा लागेल. तुमचा कप साधारण चहाच्या कपच्या आकाराचा हवा.
या घरगुती मॉइश्चरायझरने त्वचेला पोषण देण्यासाठी तुम्हाला हे किमान दिवसातून दोनदा त्वचेवर लावावे लागेल. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आणि हातावर हे मॉइश्चरायझर लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा याचा वापर करू शकतात. तुम्ही या मॉइश्चरायझर हात, चेहरा, पाय त्याचबरोबर संपूर्ण शरीरावर उपयोग करू शकतात.
काही लोकांच्या त्वचेला लिंबूची एलर्जी असते, तर त्या लोकांनी लिंबू न मिसळता हे मिश्रण तयार करावे. या मिश्रणाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही हे मिश्रण तयार झाल्यावर सात दिवस वापरू शकतात. सात दिवसानंतर तुम्हाला पुन्हा ताजे मिश्रण तयार करावे लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Kalicharan Maharaj | “डुकराच्या दाताचे पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा…”; कालीचरण महाराजांचं अजब वक्तव्य
- Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, अजित पवार म्हणाले…
- Amit Shah | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- IPL Auction 2023 | आयपीएल मिनी लिलावामध्ये ‘या’ 15 वर्षीय खेळाडूवर लागणार बोली
- Ajit Pawar | “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का?”; अजित पवारांचा खोचक सवाल
Comments are closed.