“ईडीच्या नोटीसा आल्या म्हणून, शिवसेनेचं मनोधैर्य खचणार नाही, किंबहूना ते अधिक मजबूत होईल”

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. परंतु ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे याचा स्पष्टं उल्लेख नाही. मात्र अनिल परब यांना आलेल्या नोटिसीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी अनिल परब यांना बोलावण्यात आलं आहे. कोणत्या प्रकरणाशी संबंधित चौकशीला बोलावलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान अनिल परब आज शिवसेनेचे खासादर आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल परब चौकशीला ईडी कार्यालयात जाणार का? याचं उत्तर दिलं.

अनिल परब मला नेहमीच भेटत असतात. ईडीची नोटीस आली म्हणून आमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळत नाही. कर नाही तर डर कशाला. आम्ही जाऊ ना समोर. ईडीला काय धमक्या देणार नाही, असं राऊत म्हणाले. पुढे राऊत यांना अनिल परब चौकशीला जाणार का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर राऊत यांनी कॅमेरे लावून ठेवा, असा सूचक इशारा दिला.

शेवटी कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाया त्याच पद्धतीने लढायच्या असतात. अनिल परब हे वकील आहेत त्यांना माहिती आहे काय करायचं ते, असं राऊत म्हणाले. शिवसेना हे टार्गेट आहे. हे टार्गेट का केलं जात हे सर्वांना माहिती आहे. पण याचा तसूभरही परिणाम सरकारवर होणार नाही. शिवसेनेचं मनोधैर्य खचणार नाही. किंबहूना ते अधिक मजबूत होत आहे, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा