InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राजन विचारे यांच्या प्रयत्नाने दिव्यागांना साहित्य वाटप

केंद्र शासनाची योजना खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून 229 अपंग व दिव्यागांना साहित्य वाटप केले. मिरा भाईंदर मधील दिव्यांगांना साहित्य वाटप खासदार राजन विचारे यांनी केले. केंद्र सरकार व एल्मीको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरा भाईंदरमध्ये मक्सेस मॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये 21 लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्यात एकूण 229 लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आला.

26 जानेवारी 2019 रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या कार्यालयात एक दिव्यांगासाठी शिबीर घेऊन त्यामध्ये 400 लोकांची तपासणी केली होती. यानंतर त्यांची कागदपत्रे मागवून त्यामधून 229 लोकांना पात्र ठरवून त्यांना लागणाऱ्या साहित्याची माहिती घेण्यात आली. यानंतर केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ठाणे लोकसभा मतदार संघात साहित्याचे वाटप करण्यात आले.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.