InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘या’ व्हिडीओ मुळे उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत…

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उत्तर मुंबई मधून त्या कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीत ऊभ्या होत्या. मात्र, राज्यभरातच देशभरातच कॉंग्रेसची जी वाताहत झाली त्याच्या बळी ऊर्मिला मातोंडकरदेखील झाल्य़ात. त्यांच्या विरोधात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत बाजी मारली आणि मोतोंडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

उर्मिला मातोंडकर पुन्हा आता चर्चेत आल्या आहेत. त्यांचा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना धीर देणारा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर हीट होत आहे.

या व्हिडीओ मध्ये त्यांनी राज्यस्तरीय युवा मंथन शिबाराला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या हताश, निराश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना दिसत आहेत.

- Advertisement -

त्या सांगतात, माझा दृढ विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीचं जे चरित्र असतं जे धैर्य आणि सामर्थ्य असतं ते त्यांच्या चांगल्या नाही तर त्यांच्या पडत्या काळात भरभरून समोर येतं ते स्वताच्या आणि समाजाच्या लक्षात येतं आणि अशी एक वेळ आपल्या सर्वांच्या सोबत ऊभी आहे. त्यामुळे आज गरज आहे की आपलं धैर्य आणि सामर्थ्य पणाला लावून आपल्या पक्षाच्या आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी एक जोरदार लढा दिला पाहीजे.

धन्यवाद उर्मिलाजी … Thank you Urmila Matondkar ji .

Geplaatst door Satyajeet Tambe op Zondag 16 juni 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.