InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

MIMच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेची हत्या; सोलापुरात खळबळ

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली आहे. रेश्मा पडनेकुर यांनी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. सोलापूरच्या विजयपूर परिसरात त्यांच्या मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

17 एप्रिल रोजी रेश्मा यांनी सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. काल रात्रीच्या विजयपूर जवळील कोलार गावात त्यांच्या मृतदेह सापडला. रेश्मा यांच्या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.