Women Wrestler | ‘सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी दंगल’, तारीख आली समोर

Women Wrestler | सांगली : महाराष्ट्रात पुरुषप्रधानतेमुळे अधिकाधिक पुरुषांचे खेळ पहायला मिळत होते. परंतु बदलती मानसिकता, बदलता दृष्टिकोन या बाबी विचारात घेऊन महिला कुस्तीगीर संघटनेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं. ही स्पर्धा सांगलीत २३ आणि २४ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.

Sangli In 350 To 400 Women Wrestler

सांगली जिल्ह्यात पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्यातून खेचून आणण्यासाठी कुस्तीपटू तयारीला लागल्या आहेत. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ३५० ते ४०० महिला मल्ल या स्पर्धेसाठी येतील असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like