तिसऱ्या पत्रीपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात

गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवलीकर आतुरतेने वाट पाहत असलेल्या पत्रीपुलाचे काम येत्या मार्च अखेरीस पूर्ण केले जाणार आहे. हा पूल उभारण्यासाठी आलेल्या तांत्रिक आणि इतर सर्व अडचणी आता दूर झाल्या असल्याने मार्च महिन्यात तो पूर्णत्वास येईल अशी माहिती एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाचा पाहणीदौरा केला.

‘सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजत आहे’

आज पत्रीपुलाच्या कामाचा पाहणी दौरा दरम्यान गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्याया नविन उड्डाणपूलाचे काम विविध तांत्रिक आणि इतर अडचणींचा सामना करत शेवटच्या टप्प्यात आला असून या पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या दोन्ही दिशेला पायलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर यावर उभारला जाणारा गर्डर हैद्राबादमध्ये बनवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात रेल्वेचे तांत्रिक अधिकारी हैद्राबादला जाऊन या गर्डरची पाहणी करणार असून त्यांच्याकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर तो गर्डर इकडे आणला जाईल.

Loading...

आणि याठिकाणी बसवण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच याठिकाणी हा गर्डर उभारण्यासाठी रेल्वे प्रशासन पाच पाच तासाचे 2 मेगाब्लॉक घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.