“तुझ्या वयाच्या अभिनेत्री सोबत काम कर; तुझ्या बोरिंग कथांनी कंटाळा आला”: सोफिया हयातचा सलमानवर निशाणा

मुंबई : मॉडले सोफिया हयात ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच सोफियाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सोफीयाने सलमान खानवर तसेच सलमानच्या ‘राधे’ चित्रपटावर टीका केली आहे.

सोफियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ‘पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सलमानने जुन्या ट्रिकचा वापर केला आहे. त्याने पुन्हा ईदच्या दिवशीच चित्रपट प्रदर्शित केला. त्याने तिच बोरिंग कथा आणि लूकचा वापर चित्रपटात केला आहे. सलमान नेहमी त्याच्या चित्रपटात तरुण अभिनेत्रींसोबत काम करताना दिसतो. तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रीसोबत कधी काम करणार? आता त्याचा चाहता वर्ग त्याच्या नेहमीच्या बोरिंग कथा पाहून कंटाळला आहे’ असे सोफिया म्हणाली.

पुढे अभिनेता रणदीप हुड्डा विषयी बोलताना ती म्हणाली, ‘चित्रपटात रणदीप हुड्डाला पाहून वाईट वाटले. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याने ही भूमिका करण्यास होकार दिला कारण हा सलमान खानचा चित्रपट होता? ही संपूर्ण इंडस्ट्रीची समस्या आहे. चित्रपटातील रणदीपचे पात्र योग्य पद्धतीने लिहिले गेलेले नाही असे जर तो बोलला तर त्याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढले असते?’अशी भली मोठी पोस्ट करून सोफियाने सलमान खान वर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा