“वंचित, गरीब जनतेच्या विकासासाठी कार्य करणे, हीच गोपीनाथ मुंडेंसाठी खरी श्रद्धांजली”: जे.पी. नड्डा

मुंबई : दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यातिथीनिमित्ताने भारत सरकारच्या टपाल विभागाकडून त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले.

यावेळी जे.पी. नड्डा म्हणाले, “गोपीनाथ मुंडे हे केवळ एका समाजाचे नेते नसून तळागळातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनेते होते. त्यामुळे देशातल्या वंचित, गरीब जनतेच्या विकासासाठी कार्य करणे, हीच मुंडे यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.”

पुढे जे. पी. नड्डा म्हणाले, “टपाल विभागाच्या या उपक्रमामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याची माहिती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

“गोपीनाथ मुंडे हे लोकनेते व लोकनायक होते. सत्तेविरोधात संघर्ष करतो तोच खरा नेता असतो हे त्यांनी वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा