InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

World cup 2019: सेमी फायनलच्या वेळी पाऊस पडला तर ‘ही’ टीम जाणार फायनलमध्ये

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनलला पोहोचणार, असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला असेल.

सेमी फायनलच्या वेळी इंग्लंडमधल्या हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मॅच होऊ शकली नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात येईल.

मॅनचेस्टरमध्ये मंगळवारी मॅच झाली नाही तर हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. पण मॅनचेस्टरमध्ये बुधवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी पावसामुळे सामना झाला नाही, तर टीम इंडिया मॅच न खेळताच फायनलमध्ये प्रवेश करेल.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply