InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारताचा डाव 221 धावांवर संपुष्टात, न्युझीलँड फायनलमध्ये

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंगधोनी यांनी अखेरच्या षटकांमध्ये सामन्यात रंग भरले. पण जडेजा आणि धोनी यांना भारताला विजय मिळवून देता आला नाही. भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. न्यूझीलंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त एक धाव काढून बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे तिघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश कार्तिक सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांची चांगली भागिदारी असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या 32 धावांवर बाद झाला. पांड्यानंतर जडेजा आणि धोनी यांनी शतकी भागिदारी केली. जडेजानं आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतक केवळ 39 धावांत पूर्ण केले. मात्र, जडेजा 77 धावांवर बाद झाला.

महेंद्रसिंग धोनीसह रवींद्र जडेजा यांनी डावाची उत्तम बांधणी करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. जडेजाने ५९ चेंडूंत प्रत्येकी चार षटकार आणि चौकार लगावत ७७ धावा केल्या. धोनीनेही ५० धावांची खेळी साकारली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply