InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

World cup: कोहलीने ‘ती’ चूक पुन्हा केल्यास भारतासाठी मोठा धक्का

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सफाईदार विजय मिळवून भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जेतेपद दूर नाही, असेही बोलले जात आहे. पण, या आनंदायी मार्गात मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला उपांत्य फेरीच्या लढतीला मुकावे लागू शकते. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध कोहलीकडून ‘ती’ एक चूक पुन्हा घडल्यास भारतासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या लढतीत कोहली वैतागलेला पाहायला मिळाला आणि रागाच्या भरात त्यानं मैदानावर पंचांशी हुज्जत घातली. बांगलादेशच्या डावातील 11 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार पायचीत झाल्याचे अपील करण्यात आले. मैदानावरील पंच मॅरीइस इरास्मसने नाबाद असा निर्णय दिला आणि कोहलीनं DRS घेण्याचा निर्णय घेतला. तिसरे पंच अलीम दार यांनीही तपासणी केल्यानंतर चेंडू बॅटीला लागून पॅडवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे त्यांनी इरास्मस यांचा निर्णय कायम राखला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply