World Test Championship | काय करणार BCCI?, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयपीएल 2023 फायनल एकाच वेळी
World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) आणि आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डला म्हणजेच बीसीसीआय (BCCI) ला मोठा धक्का बसू शकतो. कारण या दोन्ही स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये खेळणे परदेशी खेळाडूंना कठीण होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) आणि आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामना एकाच वेळी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हलच्या मैदानावर खेळला जाऊ शकतो. त्याचबरोबर दोन महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या आयपीएलचा अंतिम सामना देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नियोजना जाऊ शकतो. एमपीएससी फायनल आणि आयपीएल यांच्यामध्ये टक्कर होऊ शकते. आता बीसीसीआय या स्थितीला कशाप्रकारे हाताळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मर्यादित षटकांच्या आणि टी-20 सामन्यांमध्ये सध्या इंग्लंड क्रिकेटचा दबदबा सुरू आहे. कारण इंग्लंड संघाने या दोन्ही फॉरमॅटचे विश्वचषक आपल्या नावावर केले आहे. पण कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड संघ अजूनही मागे आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असे चित्र दिसत आहे. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीमध्ये विजय मिळवल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची अंतिम फेरीत जाण्याची शक्यता जास्त वाढली आहे.
नियमानुसार, आयसीसी स्पर्धेत सात दिवस आधी इतर कोणतेही टूर्नामेंटचे आयोजन केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ची फायनल जर सात ते 11 जून दरम्यान आयोजित केली तर आयपीएल 2023 ची फायनल 30 मे किंवा त्याच्या आधी आयोजित करावी लागू शकते. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम स्पेलिंग मध्ये भारतीय संघ पात्र ठरला तर भारतीय संघातील खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विश्रांती घ्यायला वेळच मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- Gujarat Election Results 2022 | गुजरात निकालांवर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…
- SSC Ricruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास
- Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले?
- Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास मिळू शकतात अनेक फायदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.