World Test Championship | पाकिस्तान संघ पडला WTC मधून बाहेर, पाहा पॉईंट्स टेबल

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) क्रमवारीमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर पाकिस्तान संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम स्पर्धेमध्ये पोहोचण्याचे मार्ग बंद झाले आहेत. भारतीय संघाने अजूनही अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे जेतेपद आपल्या नावावर करावे लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी शर्यतीमध्ये आता फक्त चार संघ राहिले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारत यांचा समावेश आहे. पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी या यादीतून न्यूझीलंड, वेस्टइंडीज, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ बाहेर पडले आहेत. दरम्यान, आजच्या विजयानंतर भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची टक्केवारी वाढली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी सध्या 58.93% आहे. या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया संघ आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका तर चौथ्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे स्थान जवळपास निश्चितच आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी सध्या तीन संघ लढत आहे. फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला आणि दक्षिण आफ्रिकेला उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. यामध्ये भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी चार सामन्यांची कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग सोपा होईल.

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर भारत दुसऱ्या स्थानावर आला होता. बांगलादेश विरुद्ध ढाका येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकावरचे स्थान अधिक मजबूत केले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.