World Test Championship | बांगलादेश कसोटीनंतर भारताची WTC पॉईंट्स टेबलमध्ये 4 टक्क्याने वाढ
World Test Championship | ढाका: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) क्रमवारीमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. भारतीय संघाने अजूनही अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे जेतेपद आपल्या नावावर करावे लागणार आहे.
बांगलादेश कसोटीनंतर भारताची World Test Championship पॉईंट्स टेबलमध्ये 4 टक्क्याने वाढ
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर भारत दुसऱ्या स्थानावर आला होता. बांगलादेश विरुद्ध ढाका येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकावरचे स्थान अधिक मजबूत केले आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 55.57 वरून 58.93 पर्यंत वाढली आहे. या क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका अनुक्रमे तीन आणि चार स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे चार संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीमध्ये राहिले आहे. पाकिस्तान हा संघ या शर्यतीतून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला आहे. बांगलादेश, न्युझीलँड, वेस्टइंडीज या यादीतून आधीच बाहेर पडले आहे. तर भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. यामध्ये पहिल्या डावात यजमानांनी 227 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय संघाने पहिला डाव 314 धावांवर संपवला. तर दुसऱ्या डावांमध्ये केवळ 231 धावात बांगलादेश संघ बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करण्यासाठी 145 धावांचे लक्ष मिळाले. दरम्यान, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाला जेतेपद पटकावून दिले.
महत्वाच्या बातम्या
- Health Care | ताप आणि सर्दीवर रामबाण उपाय आहे ‘या’ गोष्टी
- Samsung Mobile | सॅमसंगच्या ‘या’ मोबाईलवर बंपर डिस्काउंट, करा आजच खरेदी
- IND vs BAN | शेवटच्या सामन्यात 9 धावा करत बाद झाला ऋषभ पंत, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
- Corona Virus | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- SBI Recruitment | SBI मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.