World Test Championship | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर! पाहा यादी

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ (Team India) सुसज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा अंतिम सामना होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून हे सामने खेळले जाणार आहे. या ब्लॉकबस्टर अंतिम सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. भारतीय संघामध्ये 3 फिरकीपटू, 5 वेगवान गोलंदाज, 1 यष्टीरक्षक, आणि 6 फलंदाजांना स्थान मिळाले आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला संघात स्थान मिळाले नाही. सूर्याच्या जागी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे अजिंक्यला हे बक्षीस मिळाले आहे. तब्बल 15 महिन्यानंतर अजिंक्य रहाणे भारतीय संघामध्ये परतला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – भारतीय संघ (World Test Championship – Indian Team)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकर.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – ऑस्ट्रेलिया संघ (World Test Championship – Team Australia)

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

महत्वाच्या बातम्या