World Test Championship | WTC फायनलची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याच्या (Final Match) तारखा जाहीर केल्या आहे. इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर WTC चा अंतिम सामना रंगणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत 100 हून अधिक कसोटी सामने खेळले गेलेले आहे. या मैदानावर 7 ते 11 जून 2023 दरम्यान WTC फायनल रंगणार आहे. यामध्ये 12 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया WTC शर्यतीत आघाडीवर (India and Australia are leading the WTC race)

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship) च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. तर, दुसऱ्या स्थानावर भारतीय संघ आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर अंतिम फेरीबाबतचे चित्र अजून स्पष्ट होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय या शर्यतीमध्ये (World Test Championship) श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेला वेस्टइंडीज विरोधात घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर श्रीलंकेला न्युझीलँडसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

2021 मध्ये न्युझीलँडने साउथेम्प्टनच्या मैदानावर पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) च्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव करत जेतेपद आपल्या नावावर केले होते. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.