InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

#WorldHeartDay – पालकांनो, मुलांचं हृदय जपा

मुलांचं आरोग्य म्हटलं की अनेकदा फक्त त्यांच्या खाण्याचा विचार केला जातो. मात्र प्रौढ वयात हृदयाचे आजार बळावण्यासाठी लहानपणापासूनची जीवनशैली अनेकदा कारणीभूत असते. त्यामुळे मुलांचं हृदय लहानपणापासूनच निरोगी कसं राहिल याची पालकांनी कशी काळजी घ्यावी. याबाबत मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील कन्सलटंट पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्वाती गारेकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.

सध्या आरोग्याबाबत जनजागृती वाढते आहे. प्रत्येक जण जिमसाठी वेळ देतो आहे किंवा डाएट करत आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे हृदय निरोगी राहिल यासाठी आवश्यक असलेल्या सवयी लहानपणापासूनच लागायला हव्यात.

Loading...

आपण वापरत असलेले बहुतेक मसाले औषधी आहेत. अळशी हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. माइल्डि ड्राय रोस्टिंग करताना अळशी त्या पदार्थावर भुरभूरू शकतो.

तुपाचं सेवन आरोग्यासाठी चांगलं आहे. जेवणात तेल कमी वापरण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही कोणत्या तारखेला किती तेल घेतलं आणि ते कधी संपलं त्याची नोंद करा. पुढच्या वेळी तेल घेताना तितकंच तेल आधीपेक्षा जास्त दिवस वापरलं जाईल याचा प्रयत्न करा. राइस ब्रॅन, कॅनोला, सनफ्लॉवर, ग्राऊंडनट, ऑलिव्ह ऑईल हे काही हृदयासाठी चांगले असलेले तेल आहेत. 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना त्यांना दररोज आवश्यक असलेल्या कॅलरीपेक्षा 30 टक्क्यांहून अधिक फॅट दिलं जाऊ नये

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.