InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

#WorldRabiesDay – रेबीजवर उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा

रेबीज हा आजार प्राणघातक असल्याने तसेच यावर प्रभावी उपचार नसल्याने प्रतिबंधक उपायाला खूप महत्व आहे.

रेबीज हा एक संसर्गजन्य विषाणूचा आजार असून तो फार घातक ठरू शकतो. 99 टक्के प्रकरणांमध्ये कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये हे विषाणू पसरतात. रेबीज हा कुत्रे आणि जंगली प्राण्यांमार्फत देखील परू शकतो. प्राणी चावल्याने, नखं मारल्याने किंवा त्यांच्या लाळेमार्फत माणसांनी रेबीज होण्याची शक्यता असते.

Loading...

रेबीजला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचा वापर करू शकतो. रेबीज हा आजार प्राणघातक असल्याने तसेच यावर प्रभावी उपचार नसल्याने प्रतिबंधक उपायाला खूप महत्व आहे.

पुण्यातील जनरल फिजीशियन डॉ. स्वप्ना बेहरे म्हणाल्या, “रेबीजच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर आजार होईपर्यंतचा काळ तीन महिने असतो. सामान्यपणे रूग्णांना प्रथम ताप येतो. त्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यानंतर मज्जातंतूद्वारे मध्यवर्ती मज्जा संस्थेत प्रवेश करतात. ”

- Advertisement -

नागरिक संघटनेच्या म्हणण्यानुसार, देशात दररोज जवळपास 1,41,960 व्यक्तींना श्वान दंश होतो. यातील वर्षाला साधारणतः वीस हजार जणांचा मृत्यू होतो. तर महाराष्ट्रात दररोज अंदाजे 7,777 जणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. विशेषतः श्वान दंश झालेल्यांपैकी 80 टक्के रुग्ण हे 3 ते 8 या वयोगटातील असतात.

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.