InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जगावर पुन्हा आर्थिक मंदीचे ढग; बेरोजगारीमध्ये वाढ होण्याची भीती

चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपातील अनेक देशांचा खाली गेलेला विकासदर (जीडीपी), हिंदुस्थानात वाहन उद्योगात आलेली मंदी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगावर पुन्हा आर्थिक मंदीचे ढग जमा होऊ लागले आहेत, अशी भीती व्यक्त होत आहे. याचा फटका अनेक देशांना बसू शकतो. बेरोजगारीमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

‘ब्लुमबर्ग’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच बँक ऑफ अमेरिकेनेही आर्थिक मंदीच्या सावटामुळे जागतिक जीडीपी सुमारे 3.3 टक्क्यांपर्यंत खाली येईल अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेतील मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टेलीने तर जागतिक जीडीपी 2019 मध्ये 3 टक्के आणि 2020 मध्ये 3.2 टक्के असेल असे भाकीत केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply