चिंताजनक : कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या 259वर

राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 41642 वर गेला आहे. तर त्यातील सर्वाधिक म्हणजे 27251 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. तसेच कोल्हापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी एका दिवसात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

परप्रांतीय कामगारांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखावे-शरद पवार

सकाळी 4 ते रात्री 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 259 वर पोहोचली आहे. कोल्हापूरचे स्थानिक प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर नागरिकांना गरज पडत असेल तरच बाहेर पडा असे आवाहन करत आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल केला असल्याने अनेक उद्योगधंदे व व्यवसाय आणि बाजार पेठा सुरु झाल्या असल्याने नागरिक घरा बाहेर पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी न बाळगल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

Loading...

तसेच पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजारच्या वर गेला आहे. तर शुक्रवारी एका दिवसात पुण्यात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.