InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का ? – अजित पवार

मुंबई – देशातील आणीबाणीवेळी तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन देण्यासंदर्भातील प्रश्नावर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून आणीबाणीतील तरुंगवास भोगणाऱ्यांना सत्ताधारीच कारणीभूत असल्याचं म्हणत अजित पवारांना लक्ष्य केलं. सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात आणीबाणीतील तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणाऱ्या पेन्शनबद्दल अजित पवारांचे धन्यवाद मानले. त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना, आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का ? असा प्रश्नच पवार यांनी उपस्थित केला.

आणीबाणीच्या काळात मी केवळ 16 वर्षांचा होतो, म्हणजे मी सज्ञानही नव्हतो. त्यावेळी, माझे मामा एनडी पाटील हे तुरुंगात गेले होते. जर, आमचं सरकार असतं तर माझा सख्खा मामा तुरुंगात गेला असता का? साधं गणितंय. आमचं सरकार असतं तर, माझे दुसरे मामा चंद्रशेखर कदमांचे वडिल. त्यामुळे आणीबाणीच्या काळात आम्ही सत्तेत नव्हतो. याउलट आणीबाणीच्या काळात आम्ही तुमच्यासोबतच होतो, पण तुम्ही आता ते विसरलात असे म्हणत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply