InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आशियाई स्पर्धांसाठी कुस्तीपटूंची नावे घोषीत, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला वगळले?

- Advertisement -

इंडोनेशियात यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी सहभागी होणाऱ्या भारताच्या कुस्तीपटूंची नावे जाहीर झाली आहेत. आज सोनिपत येथे झालेल्या ट्रायल्सनंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भारताकडून 2010 च्या आशियाई स्पर्धेचा कांस्य पदक विजेता मौसम खत्री 97 किलो वजनी गटात तर पवन कुमारची 86 किलो वजनी गटात निवड झाली आहे.

खत्रीने आशियाई स्पर्धां स्थान मिळवण्यासाठी ट्रायल्सच्या अंतिम फेरीत सत्यव्रत कदियानला पराभूत केले.

तसेच सुशिल कुमार आणि बजरंग पुनिया यांना त्यांच्या आधीच्या कामगिरीमुळे डब्लूएफआयने (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) ट्रायल पासून सुट देण्यात आली होती. ते यावर्षीच्या आशियाई स्पर्धांमध्ये अनुक्रमे 74 किलो आणि 61 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील.

याचबरोबर सुमित हा 125 वजनी गटासाठी पात्र ठरला आहे.

तसेच ट्रायल्सचे 57 किलो वजनी गटातील निर्णय राखून ठेवले आहेत. कारण या वजनी गटातील संदिप तोमर, उत्कर्ष काळे आणि रवी यांचे सारखेच गुण झाले आहेत. त्यांची पुन्हा ट्रायसल १३ जूनला होणार आहे.

त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारे आणि कांस्य पदक विजेत्या सोमवीरला  त्यांचे वजन वाढत्यामुळे ट्रायल्समध्ये सहभागी होता आले नाही.

डब्लूएफआयने भारताच्या  आशियाई स्पर्धेसाठी ग्रीको रोमन कुस्तीपटूंचीही नावे घोषित केली आहेत. ही स्पर्धा 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. 

- Advertisement -

डब्ल्यूएफआयने ज्ञानेंद्र (60 किलो), मनीष (67 किलो), गुरप्रीत सिंग (77 किलो), हरप्रीत सिंग (87 किलो), हरदीप (9 7 किलो) आणि नवीन (125 किलो) यांची निवड केली.

महिला कुस्तीपटूंच्या ट्रायल्स रविवारी लखनऊला पार पडतील.

वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

महत्त्वाच्या बातम्या: 

टाॅप ५- प्रो कबड्डीतील टॉप ५ बचावपटूंच्या कामगिरीवर एक नजर…

तब्बल १९ ग्रॅंडस्लॅम विजेत्या महान टेनिसपटू मारिया ब्युनो यांचे निधन

मेस्सीच्या मॅजिकवर अर्जेंटिनाची मदार

फ्रेंच ओपनला आज मिळणार महिला एकेरीची नवी विजेती

कोहलीच्या दाढीच्या इन्शुरन्सबद्दलच्या चर्चा भंपक!

संघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.