InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

wrestling

आशियाई कुस्ती स्पर्धेत ओंकार पाटीलला रौप्य तर अनिल वाघमोडे कांस्यपदकाचा मानकरी

पुणे । इराण -तेहरान येथे २ ते ३ आॅगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या एशियन स्कूल बॉईज ग्रीकोरोमन फ्रीस्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिप २०१८ या स्पर्धेत सह्याद्री कुस्ती संकुलातील मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली.ओंकार पाटील याने ५७ किलो वजनी गटात ग्रीकोरोमन प्रकारात रौप्य पदक मिळवून दिले. तर अनिल वाघमोडे याने फ्रीस्टाईल गटात भारताला कांस्य पदक मिळवून दिले.वारजे येथील सह्याद्री कुस्ती येथे हे मल्ल करीत आहेत. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष विजय बराटे तसेच संकुलातील एनआयएस प्रशिक्षक संदीप पठारे, सियानंद दहिया, दिलीप…
Read More...

ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाला सुवर्ण पदक

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये भारतीय कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले आहे.74 किलो वजनी गटात राठीने मंगोलियाच्या बॅट-इरडेने ब्यमासुरेनला पराभूत केले. याच गटात सुशील कुमारही खेळतो. राठीने मागच्याच वर्षी वरिष्ठ गटातून पदार्पण केले होते. त्यावेळी मात्र तो पराभूत झाला होता."एका क्षणी मी या सामन्यात मागे राहिलो होतो पण मला या विजयाबाबत खात्री होती. उपांत्यफेरीचा सामना तर या ही पेक्षा अवघड होता पण तो सामना मी जिंकलो म्हणूनच मी हा सामना जिंकून…
Read More...

महाराष्ट्राच्या स्वातीला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक

दिल्ली येथील खाशाबा जाधव कुस्ती संकुलास सुरु असलेल्या स्पर्धेत 53 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने रिपेचमध्ये पदकाची जादू घडविली.थायलंडच्या बूनियासूवर 10-0 गुणांनी मात करीत स्वातीने कांस्य पदक जिंकले. पहिल्या फेरीपासूनच आक्रमक पवित्रा घेत स्वातीने एकेरी पटावर 2गुणांची कमाई केली.पहिल्याच मिनिटाला भारद्वाज डावावर सलग 8 गुणांची खेळी करित स्पर्धेच्या तिसर्या दिवसाचे पहिले पदक देशाच्या नावापुढे झळकावले. सुवर्ण पदक अपेक्षेप्रमाणे जपानच्या युहोंग झोंगने जिंकलेयावेळी स्वातीला…
Read More...

कुस्तीपटू सुशील कुमार चार वर्षात पहिल्यांदाच झाला पराभूत

भारताचा दोनवेळचा आॅलिम्पिकपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला 4जुलैला जॉर्जियामध्ये झालेल्या त्बिलिसी ग्रांप्री स्पर्धेत अँड्रज पिओर सोक्लस्की विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा त्याचा चार वर्षातील पहिलाच पराभव आहे.सुशीलला 74 किलोवजनी गटात अँड्रज पिओर सोक्लस्कीने 4-8 असे पराभूत केले आहे. याआधी सुशील मे 2014 ला इटलीमध्ये फ्रान्सच्या लुका लॅम्पिसविरुद्ध पराभूत झाला होता.सुशील आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सहभागी होणार आहे. त्यादृष्टीने आजची लढत महत्त्वाची होती.मागील…
Read More...

पुणे शहर संघाच्या मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार

पुणे | कुस्ती या खेळाला उत्तेजकांपासून मुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय तालीम संघाने मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राष्ट्रीय तालीम संघाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी वरिष्ठ गटाचा संघ पाठविताना त्यांची उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य केली आहे.आजपर्यंत अनेक खेळाडूंना उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) पास करण्यात अपयश आल्याने त्यांना आपले पदक गमवावे लागले आहे. पदक गमावल्यामुळे येणारी निराशा, त्यानंतर खेळापासून घेण्यात येणारी फारकत, अशा गोष्टीमुळे…
Read More...

भारताचा राष्ट्रीय खेळ नेमका आहे तरी कोणता? हाॅकी की कबड्डी?

भुवनेश्वर | नोव्हेंबर 2018 मध्ये भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ओरीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हॉकीली भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या हॉकी विश्वचषकाचे यजमानपद ओरीसा भूषवणार आहे.या विश्वचषकाच्या तयारी संदर्भात झालेल्या बैठकीवेळी नविन पटनायक यांना समजले की भारतात हॉकीला फक्त राष्ट्रीय खेळ मानले जातो. मात्र हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता नाही.…
Read More...

आशियाई स्पर्धांसाठी कुस्तीपटूंची नावे घोषीत, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला वगळले?

इंडोनेशियात यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी सहभागी होणाऱ्या भारताच्या कुस्तीपटूंची नावे जाहीर झाली आहेत. आज सोनिपत येथे झालेल्या ट्रायल्सनंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.भारताकडून 2010 च्या आशियाई स्पर्धेचा कांस्य पदक विजेता मौसम खत्री 97 किलो वजनी गटात तर पवन कुमारची 86 किलो वजनी गटात निवड झाली आहे.खत्रीने आशियाई स्पर्धां स्थान मिळवण्यासाठी ट्रायल्सच्या अंतिम फेरीत सत्यव्रत कदियानला पराभूत केले.तसेच सुशिल कुमार आणि बजरंग पुनिया यांना त्यांच्या आधीच्या कामगिरीमुळे डब्लूएफआयने…
Read More...

१००% निकाल- राष्ट्रकुलला गेलेल्या १२ पैकी १२ कुस्तीपटूंनी केले भारताचे नाव रोशन

गोल्ड कोस्ट | भारताने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी २२५ पेक्षा जास्त खेळाडूंचा चमू आॅस्ट्रेलियाला पाठवला होता. त्यात १५ प्रकारात भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. २२५ पैकी १२ खेळाडू हे कुस्तीपटू होते आणि विशेष म्हणजे या १२ पैकी १२ खेळाडूंनी पदक मिळवले आहे. म्हणजेच या क्रीडा प्रकारात भारताला २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत १००% यश मिळाले आहे.  या स्पर्धेत भारताने६६ पदके मिळवत पदकतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. भारताने या स्पर्धेत २६ सुवर्णपदक, २० रौप्यपदक आणि २० कांस्यपदक मिळवले आहे.गोल्ड…
Read More...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या  दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे आजच्या दिवसातील सहावे सुवर्णपदक होते.विनेश फोगटने तिची प्रतिस्पर्धी कॅनडाच्या जेसिका मॅकडोनाॅल्डचा 13-3 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.विनेश फोगटने सामन्याच्या सुरुवातीपासुनच सामन्यावर मजबुत पकड बनवली होती. तिने सामन्याच्या सुरुवातीलाच 4 गुण मिळवत  जेसिका मॅकडोनाॅल्डवर दबाब बनवण्याचा प्रयत्न केला. तिने…
Read More...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके

गोल्ड कोस्ट। भारताच्या कुस्तीपटूंनी ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस गाजवला आहे. आज भारताला कुस्तीमध्ये ४ पदके मिळाली आहेत. यात १ सुवर्णपदक, २ रौप्य आणि १ कांस्यपदक यांचा समावेश आहे.आज भारताला कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले. तर मौसम खत्री आणि पूजा धंडाने रौप्य आणि दिव्या काकरणने कांस्यपदक मिळवले.यामुळे भारताच्या खात्यात आता ४२ पदके झाली असून यात १७ सुवर्णपदके, ११ रौप्यपदके आणि १४ कांस्यपदकांचा समावेश आहे.अशी मिळवली आज कुस्तीपटूंनी पदके:…
Read More...