InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

wrestling

बजंरग पुनियाची नावाप्रमाणेच कामगिरी, ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट । कुस्तीपटू राहूल आवारे, सुशील कूमार पाठोपाठ भारताला राष्ट्रकूल स्पर्धेत कुस्तीतून तिसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे बजरंग पुनियाने. त्याने ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताचे हे कुस्तीतील तिसरे सुवर्ण तर स्पर्धेतील एकूण ३८वे पदक ठरले. एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात बजरंग पुनियाने…
Read More...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने आज सुवर्णपदक जिंकून भारताला आजच्या दिवसातले दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने फ्रीस्टाईलमध्ये ७४ किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर १०-० ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण २९…
Read More...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बबिता फोगाटने पटकावले रौप्यपदक

गोल्ड कोस्ट | भारतीय मल्लांनी येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांचा सपाटा सुरू केला आहे. त्यात राहूल आवारे, बबीता फोगाट आणि किरण या खेळाडूंचा समावेश आहे. बबिता फोगाटने आज ५३ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. यामूळे भारताचे पदकतालिकेतील स्थान भक्कम झाले आहे. तिला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. फायनलमध्ये कॅनडाच्या…
Read More...

महाराष्ट्राच्या राहूल आवारेचा आॅस्ट्रेलियात डंका, कुस्तीत भारताला दिले सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट | आज सकाळच्या सत्रात भारताचे पदक पक्के करणाऱ्या राहूल आवारेने जबरदस्त कामगिरी करताना पदक पक्के केले होते तर दुपारच्या सत्रात या पदकाचा त्याने रंग बदलला आहे. त्याने कुस्तीत ५७ किलो वजनी गटात ही सुवर्णमय कामगिरी केली आहे.  आपली पहिलीच राष्ट्रकूल स्पर्धा खेळणाऱ्या राहूलने चमकदार कामगिरी करताना सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा मल्ल मुहम्मद…
Read More...

- Advertisement -

मल्ल निलेश कणदूरकरची मृत्यूशी झुंज अपयशी, कुस्ती खेळताना झाला होता जखमी

कोल्हापूर । कुस्तापटू निलेश कणदूरकर याची मृत्यूशी झुंज आज पहाटे अपयशी ठरली. कराडच्या कृष्णा हॉस्पिलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावचा उदयोन्मुख मल्ल निलेश कुस्ती आखाड्यात कुस्ती खेळतानाच जखमी झाला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी मल्लाने मानेवर एकचाक डाव खेळला त्यात निलेशच्या मानेची नस तुटून मणके विस्कळीत झाले…
Read More...

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतची हिंदकेसरी परवेशवर मात

पुणे । उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंदकेसरी हरियाणाचा परवेश मान यांच्यात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत किरण भगत विजयी ठरला. तब्बल अर्धा तास चाललेल्या या कुस्तीत दोघेही मल्ल ताकदीने लढले. परंतु किरण भगतच्या चालीपुढे परवेश मान अखेर अपयशी ठरला. आणि किरणने चांदीची गदा पटकाविली. समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव…
Read More...

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे, मुन्ना झुंझुरके विजयी

पुणे । विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष…
Read More...

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या गणेश जगतापला विजेतेपद

पुणे । सोलापूरच्या गणेश जगतापने पंजाबच्या साबा कोहालीला ६-५ असे एका गुणाच्या फरकाने पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुले गटाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. खुल्या गटाच्या अंतिम लढतीत…
Read More...

- Advertisement -

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत सोलापूरच्या गणेश जगतापसमोर पंजाबच्या साबा…

पुणे । खुल्या गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या गणेश जगतापने पुण्याच्या सचिन येलभरला तर पंजाबच्या साबा कोहालीने पुण्याच्या विकास जाधवला पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष…
Read More...

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपांत्य फेरीत

पुणे | पुण्याच्या विकास जाधवने मध्य प्रदेशच्या अभिषेक पवारला ‘भारद्वाज’ डावावर तर, सोलापूरच्या गणेश जगतापने ‘लपेट’ डावावर सैन्यदलाच्या नरेशला चीतपट करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या सचिन येलभर व साबा कोहली यांनी ही उपांत्य फेरी गाठली. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या…
Read More...