WTC Final | क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका सामन्यासाठी 2 पिच, नक्की काय आहे प्रकरण?

WTC Final | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना आजपासून (7 जुन) सुरू होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना सुरू होण्याआधी ओव्हलच्या मैदानाबद्दल मोठे अपडेट समोर आले  आहे.

There should be no interruption in the WTC Final match

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना खेळण्यासाठी 2 पिच तयार करण्यात आले आहे. लंडनमध्ये सध्या ‘जस्ट स्टॉप ऑइल’ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, म्हणून ओव्हलच्या क्रिकेट व्यवस्थापनाने अंतिम सामन्यासाठी दोन मैदान तयार केले आहे.

“हा एका आयसीसी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) आहे. त्यामुळे यासाठी आम्ही काळजीपूर्वक तयारी केली आहे. आंदोलकांकडून क्रिकेट खेळपट्टी खराब केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होऊ नये, म्हणून दुसरे पिच तयार ठेवण्यात आले आहे”, असं आयसीसीने क्रिकेट परिषदेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय संघ आयसीसी अंतिम सामना (WTC Final) पहिल्यांदाच रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आयसीसी जेतेपद मिळवण्याचा दुष्काळ संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Ch2lzd