WTC Final | आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? रोहित शर्माच्या प्रतिनिधित्वाखाली टीम इंडिया होणार का वर्ल्ड चॅम्पियन?

WTC Final | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना आजपासून (7 जुन) सुरू होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या आव्हानासाठी तयार आहे.

भारतीय संघ आयसीसी अंतिम सामना (WTC Final) पहिल्यांदाच रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आयसीसी जेतेपद मिळवण्याचा दुष्काळ संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

106 Test matches have been played between IND and AUS

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 106 कसोटी सामने झाले आहे. यामध्ये 44 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 32 सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले आहे. यापैकी 29 सामने ड्रॉ झालेले असून यातील 1 सामना टाय झाला होता. या आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया संघ भारतापेक्षा वरचढ असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, ओव्हलच्या हिरव्या पीचवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय फलंदाजाच्या समस्या वाढवू शकतात. कारण हिरवी खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर या हिरव्या मैदानात (WTC Final) ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क भारतासाठी घातक ठरू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/42mvqnu