WTC Final | WTC फायनलमध्ये टीम इंडिया उतरणार नव्या जर्सीत, जय शहांनी केली घोषणा

WTC Final | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यांआधी जय शहा (Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी टीम इंडियाच्या नव्या किट बाबत घोषणा केली आहे. टीम इंडियाचा नवीन किट प्रयोजक आदिदास असेल, असे त्यांनी ट्विट केले आहे. त्याचबरोबर WTC फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

जय शहा ट्विट करत म्हणाले, “मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, बीसीसीआयने किट प्रयोजक म्हणून आदिदास कंपनीसोबत करार केला आहे. क्रिकेट हा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जगातील एका मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत करार केल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

WTC फायनलपूर्वी विराट कोहली जखमी (Virat Kohli injured before WTC final)

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा 70 वा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये गुजरातने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर भारतीय संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) जखमी झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WnZ62e

You might also like

Comments are closed.